Ad will apear here
Next
नर्मदातिरी मी सदा मस्त
नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेऊन तो सदानंद येरवडेकर यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. ‘नर्मदा परिक्रमा ही आहे एक अनुभूती’ असे ते म्हणतात. ही अनुभूती प्राप्त करण्यासाठी त्यांनी पूर्वतयारी कशी केली, याची माहिती पुस्तकात प्रारंभी येते. ही पायी परिक्रमा त्यांनी १०८ दिवसांत पूर्ण केली.

या प्रवासात त्यांना अश्वत्थाम्याचे दर्शन झाले. ही नर्मदा मैय्याची कृपादृष्टी आहे, असे ते मानतात. हा प्रवास त्यांनी त्यांनी दैनंदिनीच्या स्वरुपात लिहिला आहे. त्यातून नर्मदेच्या किनाऱ्यांवरील सर्व तीर्थांची माहिती, नर्मदेला मिळणाऱ्या इतर नद्यांच्या संगमांची माहिती, परिक्रमेची पूर्वतयारी समजते.

एवढेच नव्हे, तर परिक्रमेचा मार्गदर्शक मार्गही त्यांनी दिला आहे. वाटेत आलेल्या अनुभवांविषयी त्यांनी सहज-सोप्या भाषेत लिहिले असून, भरपूर छायाचित्रांचा वापरही पुस्तकात केला आहे.

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन
पाने : २५२  
किंमत : २८० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSGBI
Similar Posts
नर्मदातिरी मी सदा मस्त ‘नर्मदा परिक्रमा करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे कुठेही नर्मदा मैय्याला ओलांडण्याचे नाही’, ‘परिक्रमा करताना आपल्याला कधी राजयोग, तर कधी भिकारी योग, कधी जेवायला पंचपक्वान्न, तर कधी नुसतीच बिस्किटे’, ‘दगड- धोंड्यातून वाटचाल करत पुढे आलो, तर एका शेतात एक आदिवासी शेताला पाणी देत होता.’
नर्मदातीरी मी सदा मस्त... ‘नर्मदातीरी मी सदा मस्त’ हे सदानंद येरवडेकर यांच्या लेखणीतून उतरलेले पुस्तक आहे. त्यातून नर्मदा परिक्रमेचा इतिवृत्तांत समोर येतो. ही परिक्रमेची दैनंदिनीच असल्याने परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठच आहे. परिक्रमेची पूर्वतयारी, काळजी, अनुभव, संकटे आणि समाधान अशी समग्र माहिती पुस्तकात आहे
हिमालयातील स्वर्गारोहण चारधाम यात्रा म्हणजे यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ यात्रा करण्याची इच्छा अनेकांना असते. ही यात्रा कठीण आहे. चालणे भरपूर आहे, अशी समजूत असते. ती काही अंशी खरी असली, तरी व्यवस्थित नियोजन केले, तर ती सुरळीत पार पडते, हा अनुभव डॉ. मनोहर सालफळे यांनी ‘हिमालयातील स्वर्गारोहण’ या पुस्तकातून केलेल्या मार्गदर्शनाने येतो
मी पाहिलेला जपान जपान म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, जपान म्हणजे तंत्रज्ञान, अतिप्रगत देश, असे चित्र उभे राहते. अनेक भारतीयांना जपानचे आकर्षण असते. मुकुंद नारायण लेले यांनी कुतूहलापोटी जपानला दोन वेळा भेट देऊन पर्यटनासाठी होकायडो आणि होन्शू बेटांची निवड केली. तेथील निसर्ग, संस्कृती परंपरा आणि मुख्य म्हणजे आदरातिथ्य अनुभवले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language